तळेगाव दाभाडे:
मुर्ती दान व गणेश मूर्ती विसर्जन यासाठी घरोघरी मूर्ती घेण्यासाठी श्री राजा धर्मवीर प्रतिष्ठान यांचे कार्यकर्ते येतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्व मुर्त्या नगरपालिकेकडे जमा होणार आहे. एक तास आधी स्पीकर वर घोषणा केली जाईल. ज्या नागरिकांना मूर्ती दान करायचे आहे. त्यांनी मूर्ती दान अशी चिठ्ठी मूर्तीला लावावी व विसर्जन करायचे आहे त्यांनी विसर्जनाची चिट्टी मूर्तीला लावावी असे प्रतिष्ठानच्या वतीने सुचविण्यात आले आहे.

error: Content is protected !!