वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात गौरी गणपतीचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. गणरायाच्या आगमना पासून विसर्जन पर्यत लाडक्या वरद विनायकाची सेवा बजावून गणेश भक्तानी लाडक्या मोरयाला निरोप दिला. त्या सोबतीने गौरीचे विसर्जन करण्यात आले.
मावळ तालुक्यातील इंद्रायणी,पवना,अंद्रायणी,कुंडलिका नदीचे तीर गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने दुमदुमून गेले. ग्रामीण भागात ढोल लेझीम च्या गजरात विसर्जन पार पडले. सुवासिनी महिलांनी फेर धरून गौरी गणपतीची गाणी गायली.
पवना,ठोकळवाडी,वाडिवळे,जाधववाडी,मळवंडी धरणाच्या तीरावर परिसरातील गावागावातील भाविकांनी गणपती विसर्जनापूर्वी सामूहिक आरती म्हटली.
देहूरोड,तळेगाव दाभाडे,वडगाव मावळ,कामशेत,लोणावळा,देहू सह मोठया बाजारपेठा असलेल्या इंदोरी,नवलाखउंब्रे,टाकवे बुद्रुक,पवनानगर,कार्ला,परिसरातील भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.

error: Content is protected !!