टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील मुख्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदी पूलच्या पूर्व कामाला सुरुवात झाली आहे.आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून हे काम मार्गी लागले आहे.
ज्यावेळी कोकण महाड येथे सावित्री नदी पुलावरती दुर्घटना झाली त्यानंतर महाराष्ट्र मधील नदीवरील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्या सर्वेक्षणमध्ये प्रथमता टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदी वरील पूल धोकादायक असल्याचे सिद्ध करण्यात आले.
त्यामुळे टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली त्यामुळे औद्योगिक वसाहत मधील अवजड वाहतूक करणाऱ्या कंपन्या तसेच जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे गावातील अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद झाले तसेच भाडेतत्वावर देणाऱ्या खोल्या रिकाम्या पडल्या. यामुळे अनेकांचे आताचे रोजगार गेले उदरनिर्वाहाचा प्रश्न खूप गंभीर झाला. त्यानंतर औद्योगिक वसाहत टाकवे बुद्रुक व आंदर मावळच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पुल तत्काळ होण्यासाठी मागणी जोर धरू लागली.
त्या अनुषंगाने सेवा फाउंडेशन संस्थेने माहिती अधिकारात माहिती मागवली असता टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पूल व कान्हे फाटा येथील रेल्वे क्रॉसिंग ब्रिज मंजूर नसल्याचे सिद्ध झाले. नदीवरील पुलाची तत्काळ नव्याने उभारणी करण्यात यावी यासाठी सेवा फाउंडेशनच्या पुढाकारातून आंदर मावळ मधील सर्वपक्षीय व जनतेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यानंतर मागील अडीच वर्षापूर्वी सत्तेत असलेल्या युती सरकारने पुलासाठी निधीची घोषणा केली होती. नंतर महाविकास आघाडी सरकार मधील आमदार सुनील शेळके यांनी निधी मंजूर करून घेतला त्या नंत्तर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे .
सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन मावळ मधील सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित घेऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते, या होणाऱ्या कामामुळे अनेक कंपन्या या ठिकाणी येतील तसेच अनेकांच्या हातांना रोजगार मिळणार आहे, एक दिवसीय केलेले लाक्षणिक उपोषनाला आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. तसेच येणाऱ्या भविष्य काळामध्ये जनतेच्या हितासाठी अशी अनेक समाज उपयोगी कामे संस्थेमार्फत करत राहू.तसेच सेवा फाउंडेशन कडून माजी आमदार बाळा भेगडे व विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले आहेत.
या वेळी सेवा फाउंडेशन अध्यक्ष संदीप मालपोटे. संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश सांडभोर, तानाजी मोरे, अनिल जाधव, किरण भांगरे, निलेश जगताप, ज्ञानेश्वर ढोरे, गणेश गुरव,राघू मोरमारे, योगेश राणे,संजय जांभुळकर, उल्हास असवले, राम परदेशी, योगेश गुनाट, संतोष जांभूळकर, रोहिदास शेळके, निलेश काळोखे, मधुकर कोकाटे,योगेश कुटे,अनिल सातकर या सर्वांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या कामाची पावती मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!