वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील इंगळुन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावातील पथदिवे गेलीे अनेक दिवसांपासून चालु नसल्यामुळे सर्व रस्ते अंधारमय झाले आहेत.नुकताच श्रावण महिना चालु झाला आहे .या महिन्यात महत्वाचे गौरी गणपती यांसारखे मोठे सण आहेत. भर सणात पूर्ण गाव हे अंधारात हरवल्या सारखे वाटत पूर्ण रस्ते आणि गल्ली बोळे अंधारमय झाल्यामुळे रात्री 7/8 च्या नंतर घराच्या बाहेर पडता येत नाही. मराठी माणसांच्या महत्वाच्या सणांमध्ये जर का गावात लाईट नसेल तर अश्या सरकारी योजनांचे काय फायदे.
शासनाची पथदिव्यांची आलेली योजना फक्त काही दिवसांसाठीच अमलांत आणली गेली आणि त्यांनतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची योजना आखली गेली नाही आणि त्यामुळे सध्या गावातील लावलेले पथदिवे फक्त उन्हामध्ये सावली देण्याचे काम करत आहेत.
यासाठी ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना वारंवार विचारणा करून सुद्धा सदर पथदिव्यांचे काम केले जात नाही.
पथदिवे चालु नसल्यामुळे गणपतीच्या आरतीसाठी सकाळ संध्याकाळी गावातील सगळी मुले मिळून आरतीला जातात आणि सदर रस्त्यांवर पूर्णपणे अंधार असल्यामुळे गल्ली बोळांतून चालतांनी साप, विन्चू आणि अन्य सरपटणारे प्राणी ई चावून जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसेच सदर अंधारमय झालेल्या रस्त्यावर चालताना पाय घसरणे, पायाला ठेच लागणे यांसारखे प्रकार वारंवार चालू आहेत.
याचा विचार करता पथदिवे लवकरात लवकर चालु करण्यात यावे अशी मागणी गावातील तरुण पिढी करत आहे.
जर यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत आणि सदर बंद असलेल्या सर्व लाईट लवकरात लवकर चालू केल्या नाहीत तर वरिष्ठांना याबद्दल रितसर तक्रार करून यावर चौकशी करण्यासाठी पत्र व्यवहार करणार आहोत.

error: Content is protected !!