देहूरोड:
शेलारवाडी ता.मावळ येथे गौरी-गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले..गणपतीनंतर गौरीच्याही आगमनाने बालगोपाळांसह महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
गणेश चतुर्थी,गौरी आवाहन,गौरी पुजन या सणांमुळे घरगुती वातावरणात प्रसन्नता आलेली आहे.
सध्याची कोरोनासदृश्य परिस्थिती पाहता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला..परंतू घरगूती गणेशोत्सवात मात्र सामाजिक देखावे केल्याचे दिसून आलेले आहे.
दरवर्षी नाविण्यपूर्ण देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौ.योगिता राजू भेगडे यांनी यावर्षी पंढरपूर येथील विठूरायाचे भव्य दिव्य मंदिर साकारले असून पुढील वर्षी कोरोनाचा नायनाट होऊन पुन्हा पंढरीची वारी सुरु होऊ दे,असे साकडे गणरायाकडे घातलेले आहे.
सौ.पूजा सतिश भेगडे यांनी यावर्षी ‘बैलगाडा शर्यती व शेतकरी आत्महत्या’ यांविषयी सामाजिक बांधिलकी जोपासणारा विषय आपल्या देखाव्यातून व्यक्त केलेला आहे..कितीही संकटे आली तरीही बळीराजाने आत्महत्येचा पर्याय स्विकारु नये,असे प्रबोधन करणारा हा देखावा सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे…सौ.पुजा संकल्प भेगडे यांच्या संकल्पनेतून ‘कुंडजाई मंदिर व रांजण खळगे’ हा देखावा अप्रतिमपणे साकारलेला आहे.
त्यातून आपला परिसर व त्यातून होणारा पर्यटन विकास अधोरेखित केलेला आहे.
श्री.रणजीत शेलार यांच्या घरी छत्रपती शिवराय व अफजलखान यांच्या भेटीचा देखावा साकारला असून त्यातून राज्याचा इतिहास व ऐतिहासिक बाबी विसरुन चालता येणार नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे…सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्व देखावे पाहण्यास उपलब्ध झाल्याने शेलारवाडी येथील घरगुती देखाव्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!