राजगुरुनगर :
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या (कात्रज) कारभारात
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही संचालक मनमानी कारभार करून दूध
उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत. कष्टकरी शेतक-यांच्या जीवावर मलई खाणा-या बोक्यांची चलती आहे, असा घणाघात आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना दुग्ध व्यवसाय पूरक ठरतो. मात्र गेली काही वर्षे त्यांच्या कष्टाची संघाकडून चेष्टा सुरू आहे. गोरगरीब कष्टकरी जनतेच्या जिवावर मलई खाणाऱ्या बोक्यांची येथे चलती आहे. त्यांची ही मलई आपण लवकरच बाहेर काढून जनतेसमोर उघडे पाडणार असून या भ्रष्ट बोक्यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे, असा खळबळजनक आरोप आणि टीका आमदार दिलीप मोहिते पाटील
यांनी केली आहे. जिल्हा दूध संघात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांची सत्ता असल्याचे मानले जाते. मात्र, असे काहीच नसून राज्यात सत्ता असल्याने त्यांच्या नावाखाली येथील संचालक मंडळ दुसऱ्या पक्ष व नेत्यांच्या विचाराने कारभार करीत आहेत. उपमुख्यमंत्री
अजित पवारांनी सांगितलेला अध्यक्ष होत नाही हा अनुभव संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवर आलेला आहे.
कात्रज दूध संघात मोठ्या भ्रष्टाचार करून हे मंडळ मनमानी कारभार करीत आहे, असा आरोप मोहिते पाटील यांनी केला. या संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी यापूर्वी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, कारवाई झाली नाही. आता सीबीआयमार्फत चौकशी करावी, तसा पत्रव्यवहार लवकरच करणार आहोत,
असे आमदार मोहिते म्हणाले.
जिल्हा दूध संघाचे माजी संचालक अरुण चांभारे यांचा उमेदवारी अर्ज मागील निवडणुकीत बाद झाला होता. न्यायालयीन लढाई लढवून त्यांची अपात्रता रद्द करण्यात
आली आहे. संघाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध
झाला. त्यात चांभारे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. दूध सधाकडून त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. चांभारे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयल केले जात आहेत. यावरून आमदार मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील टीका व आरोप केले.

error: Content is protected !!