वडगाव मावळ:
कल्हाट येथील कै.भिमाबाई बबन कल्हाटकर यांच्या पंचम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि. १४ सप्टेंबर २०२१ रोजी स. १० वा. गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटप व वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना मसाज मशीन
व ब्लँकेट वाटप कार्यक्रम होणार आहे, असल्याची माहिती पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळचे अध्यक्ष संदीप कल्हाटकर यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – कल्हाट, अंगणवाडी, वस्तीशाळा (गावठाण,पवळेवाडी, करवंदेवाडी,धनवेवाडी) येथील गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व दप्तर वाटप,कल्हाट येथील वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांस मसाज मशीन व ब्लँकेट वाटप,कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांस मसाज मशीन व ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!