टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील पीएमआरडीच्या अन्यायकारक जाचापासून वाचवण्यासाठी एकवीरा कृती समितीच्या वतीने टाकवे बुद्रुक येथे दत्त मंदिर या ठिकाणी बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाई भरत मोरे, माजी सरपंच तुकाराम असवले, काळूराम मालपोटे, माऊली तलावडे,जयदास ठाकर,बाळासाहेब घोडगे,मारूती आंबेकर,बबन लालगुडे यांच्यासह बैठकीस बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
डीपी प्लॅन तयार करून सातबारावरती शिक्के मारल्यानंतर जागा संपादित केली जात नाही. जागेची खरेदी विक्री होत नाही.तसेच वीस वर्ष झोन बदलता येत नाही.
आंदर मावळ मध्ये डीपी रस्त्यांची गरज नसताना सुद्धा पीएमआरडी च्या मनमानी कारभारामुळे पीएमआरडी कडून नकाशे तयार करण्यात आले आहे.
आंदर मावळातील धरणाच्या कडेला असलेल्या 22 गावांपैकी अठरा गावांमध्ये वनीकरण झोन टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांधकाम शेती पूरक व्यवसाय करता येणार नाही.
झोन शिक्के पडल्यानंतर डीपी रस्त्याची काय भरपाई मिळणार आहे याची पूर्ण कल्पना नाही. पीएमआरडीच्या चुकीच्या धोरणाला विरोध करणे ही काळाची गरज आहे, तसेच हरकती नोंदवण्यासाठी 16 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकसान व पीएमआरडीच्या चुकीच्या धोरणाविषयी हरकती नोंदवाव्यात असे आव्हान एकवीरा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!