पिंपरी: गणपतीदान व संकलन मोहिम
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गणेशभक्तांच्या सोयीसाठी दिड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने ८ गाड्या गणपतीदान व संकलन करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.थेरगाव पुल घाट चिंंचवडगाव येथे घाटावर ३ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती ५ गाड्या फिरत्या ठेवल्या होत्या.थेरगाव पुल घाटावर ३४० भाविकांनी मुर्तींचे दान दिले व १ टन निर्माल्य जमा झाले बिजलीनगर, रस्टन कॉलनीतील,काकडेपार्क,मोरया गोसावी परिसर,श्रीधरनगर,वाल्हेकरवाडी असे एकुण ४४४ मुर्तींचे दान मिळाले. ब प्रभागातुन एकूण ७८४ गणपतीदान व ३ टन निर्माल्यादान मिळाले यामध्ये काही भाविक फोनवरुन दरवर्षीप्रमाणे येऊन मुर्तीदान करतात यामध्ये प्राधिकरण निगडी आकुर्डी मोहननगर येथून आलेत.संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जनाच्या पाचही दिवशी वेगवेगळ्या टिम तयार करुन प्रत्येक टिमला जबाबदारी दिली आहे.ब प्रभाग स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी तसेच आज दिड दिवसाची जबाबदारी संचालिका सौ सुनंदा निक्रड आणि अनुषा पै यांनी उत्तमरित्या पार पाडली दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्तीवरील तळ्यावर गेल्यानंतर गाडीतील गणपतीची सामुदायिक आरती करुन कन्व्हेअरचे उद्घाटन करुन विधीवत विसर्जन प्रभाग अधिकारी सोनम देशमुख आणि ड प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते केले यामध्ये डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शब्बीर मुजावर,मनोहर कड,रमेश भिसे, अरुण कळंबे, प्रदिप साळुंखे, जितेंद्र जाधव,सतिश उघडे,दिलीप घाटोळ,रामदास सैंदाने,शुभम खरपुडे,अक्षय खरपुडे यांनी सहभाग घेतला होता. चिंंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कृष्णा खराडे व ए पी आय विजय गरुड साहेब यांनी उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!