वडगाव मावळ:
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्याला
विरोध दर्शविण्यासाठी व हरकती विषयी माहिती या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी दि.११ला टाकवे बुद्रुक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदर मावळ परिसरातील सर्व गावातील वनझोन बदलण्यासाठी पी. एम .आर .डी पुणे यांनी नकाशे केले आहे. यासाठी हरकती मागविल्या आहे. झोन बदलण्याचे नियोजन आहे.प्रत्येक गावातील डीपी रोड व नकाशे तयार चुकीचे झाले आहेत. प्रत्येक गावातील चुकांंची दुरुस्ती व्हावी म्हणून व चुकीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्यावरील चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे .
तरी आंदर मावळातील सर्व गावचे सरपंच / उपसरपंच / सदस्य व सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांनी
स्थळ: दत्त मंदीर टाकवे बुद्रुक
वार- शनिवार
दिनांक- ११.९.२०२१
सकाळी १०.३० वाजता उपस्थितीत रहावे असे आवाहन
भाई भरत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य
आत्माराम असवले,प्रगतशील शेतकरी यांनी केले आहे.
पीएमआरडीएने ग्रामीण परिसराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना अनेक ठिकाणी झोन मध्ये बदल केले आहे. रस्त्यांसाठी जागा,आरक्षित ठेवताना स्थळ पाहणी.करण्यात आलेली नाही. हा विकास
आराखडा जाचक असून, यात अनेक शेतकरी व नागरिक बाधित होणार आहेत. अशा या जाचक
आराखड्याला विरोध दर्शवण्यासाठी या बैठकीचे आयोजन असून सबंधित शेतक-यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळेत उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!