वडगाव मावळ:
मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती नितीन शिंदे यांनी मावळातील विविध गावांना भेट देत दौरा केला, आणि नागरिकांशी संवाद साधला. वेहेरगांव ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचा व विविध योजनेंचा आढावा घेतला.
ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगांव-दहिवलीच्या वतीने सरपंच अर्चना संदीप देवकर यांच्या हस्ते सभापती शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अजय भवार,वैशाली कुंभार, ग्रा.पं.सदस्या पूजाअशोक पडवळ,ग्रा.पं.सदस्य राजु देवकर,ग्रा.पं.सदस्य अनिल गायकवाड, मुख्याध्यापक सहदेव डोंबे, ग्रामसेवक गणेश आंबेकर , अंगणवाडी शिक्षिका प्रतिभा विजय गायखे, कैलास गायकवाड तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
शिंदे यांनी दलित वस्तीतील कामांचा आढावा घेतला. त्या ठिकाणी वेहेरगांव-दहीवली ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने माजी उपसरपंच द्रौपदी बबनराव गायकवाड यांच्या हस्ते सभापती शिंदे व कुंभार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विकास कामांच्या बाबतीत योग्य ते सहकार्य करू असे आश्वासन सभापती शिंदे यांनी दिले.

error: Content is protected !!