कामशेत:
कामशेत शहराचे पोलीस पाटील कै. रोहिदास मारुती शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कामशेत येथे स्मशानभूमीजवळ प्रवचन शेड , विसावा चौथरा व रुग्णवाहिका चे लोकार्पण माजी आमदार दिगंबर भेगडे,महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे , माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे , जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे, ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन अध्यक्ष कैलास बनसोडे, पोलीस पाटील तुकाराम नाणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , जिल्हा पोलीस पाटील संघटना अध्यक्ष
साहेबराव राळे, जिल्हा महिला आघाडी पोलीस पाटील संघटना अध्यक्ष तृप्ती मांडेकर , मावळ तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष लक्ष्मण शितोळे, माऊली शिंदे, गुलाबराव वरघडे ,अभिमन्यू शिंदे ,सखाराम कुंभार ,सुकन बाफना, लक्ष्मण बालगुडे , बाळासाहेब भानुसगरे , सुनिल काजळे, गणेश काजळे , विजय सातकर , प्रकाश आगळमे , वसंत काकडे तसेच पोलीस पाटील संघटनेचे, आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकारी व विविध गावचे पोलीस पाटिल उपस्थित होते उपस्थित होते.
माजी सभापती राजाराम शिंदे म्हणाले,” आमच्या कुटुंबातील एक मोठा आधारवड व कामशेतचे पोलीस पाटील कै. रोहिदास शिंदे यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आमच्या शिंदे कुटुंबाच्या वतीने प्रवचन सभामंडप व रुग्णवाहिकेच्या लोकार्पण अर्पण करण्यात आले यामुळे ते सदैव आमच्या स्मरणात राहतील.

error: Content is protected !!