कामशेत:
प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा व खांडशी ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत खांडशी येथे महिलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबवली.गावातील महिलांनी रांगेत थांबून लसीकरण केले.
आरोग्य अधीकारी डाॅ.अनिल गिरी,राजेंद्र रणदिवे,श्रीराम नफड,अविनाश गायकवाड ,सरपंच नवनाथ राणे ,पोलीस पाटील शिवराम शिंदे,अंगणवाडी सेविका सरिता राणे ,जिजाबाई राणे ,ग्रामपंचायत कर्मचारी विनायक शिरसट,नितीन राणे ,ज्ञानेश्वर शिरसट उपस्थितीत होते .
अनेक महिलांनी लसीकरणाच्या लाभ घेतला.सरपंच नवनाथ राणे म्हणाले,” कोरोनाचे संकट गेले नाही,नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणाने पालन करणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.
सकाळच्या पहिल्या प्रहरी लसीकरण घ्यायला गावातील महिला पुरूष कामशेतला जायचे. तिथे भलीमोठी रांग पाहून परत यायचे. आरोग्य विभागाने केलेल्या मदतीने आज गावातच लसीकरण करण्यात आले.

error: Content is protected !!