भीमाशंकर:
भिमाशंकरचे अभयारण्य हे राखीव अभयारण्य आहे. विविध प्रकारचे पक्षी,प्राणी या अभयारण्यात आहेत. याची संख्या खुप वाढल्याने हे प्राणी अभयारण्यातुन मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. या प्राण्यांचा त्रास अभयारण्याच्या आजुबाजूस असलेल्या गावातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात होतो आहे.
डुक्करे,भेकरे,नीलगाई यांची संख्या खुप वाढल्याने हे प्राणी शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान करतात. तर बिबटे रानात गाई,म्हशी यांचे वर हल्ला करतात. कोल्हे,तरस शेळ्या,मेढ्या फस्त करतात तर मुंगूस कोंबड्या खातात. अशा प्रकारे खेड तालुक्यांतील पश्चिम पट्यातील गावे वन्यप्राण्यांच्या नुकसानीची शिकार झाली आहेत. यांचे मोठे नुकसान शेतकर्यांना भोगावे लागत आहे.
नुकसान भरपाईचे सरकारी धोरण म्हणजे “क्षती पाईलीची आणी भरपाई चवलीची” असे आहे. भिक नको पण कुत्रा आवरा असे नुकसान ग्रस्त शेतकर्याला म्हणायची वेळ येते.
काल खरपुडी गावात एका तरसाने थेट शेतकर्यावर हल्ला केला. तर आज कडूस गावांच्या हद्दीत वाघचे दर्शन झाले. या घटने मुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत.
या भागातील अनेक गावात वन्यप्राण्यांचा सुळसुळाट झाला आहे. तो सुळसुळाट थांबवा व हे वन्यप्राणी पुन्हा भिमाशंकर अभयारण्यात कसे नेता येईल ? या विषयी कार्यवाही करा आणी हे प्राणी पुन्हा अभयारण्यात घालवा. अशी या भागातील शेतकर्यांची सरकारला विनंती आहे , या कडे शासनाने लक्ष द्यावे असे आवाहन शनि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले.

error: Content is protected !!