तळेगाव दाभाडे:
आंदर मावळ भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष ऋषीनाथ शिंदे यांनी भाजपाला रामराम करीत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. पै ऋषीनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.शिंदे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आंदर मावळात भाजपाला खिंडार पडले.
आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात
पै.शिवाजी शिंदे,योगेश शिंदे,प्रदिप शिंदे, निलेश कालेकर,संकेत केदारी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आमदार सुनिल शेळके यांनी शिंदे यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादीत स्वागत केले.
यावेळी टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले, आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मारूती असवले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,माजी उपसरपंच अविनाश असवले, योगेश मोढवे,माजी उपसरपंच स्वामी जगताप,माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे,माजी चेअरमन रघुनाथ मालपोटे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मालपोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख मालपोटे, चेअरमन नारायण मालपोटे उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” लोकहिताची विकास कामे करण्यासाठी पै.ऋषीनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला,त्यांचे पक्षात स्वागत आहे. स्थानिक विकासाला हातभार लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, शिंदे यांनी जनतेची कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले म्हणाले,” पै.ऋषीनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाने स्थानिक पातळीवर आमची ताकद वाढली आहे. त्यांचा पक्षात मानसन्मान ठेवला जाईल.

error: Content is protected !!