वडगाव मावळ:
बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून वडगाव मावळ पोलीसांनी मुद्देमालासह सूत्रधार श्रीकांत बाळू चांदेकर वय ३२ रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली,न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
येथील फिडेक्स कंपनीच्या मागे महेश कुडे यांच्या गोडाऊनच्या समोर,ही कारवाई करण्यात आली.वडगाव मावळ न्यायालयाने या आरोपीला गुरुवारी (दि. ९) पर्यंत
पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल,
यंत्र साधन सामुग्री व कार असा एकूण ११ लाख, ९८
हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या
माहितीनुसार महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची
निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यासाठी बंदी
असताना, वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा
बनवणाऱ्या कारखाना सुरू करुन बनावट गुटखा बनवून
वितरण करत असल्याची माहिती पोलिसांना
मिळाली.
पोलीस उप निरीक्षक विजय
वडोदे, पोलीस हवालदार श्रीशल्य कंटोळी, मनोज
कदम, कैलास कदम आदींनी हजर राहून पाहणी केली
असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा
यंत्र साधनसामग्री व आरोपी श्रीकांत चांदेकर रंगेहात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

error: Content is protected !!