पवनानगर:
विद्यार्थ्यांच्या जडण घडण घडवण्यात व आदर्श व्यक्तिमत्व तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते तसेच शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडवण्याचा व विद्यार्थ्यांंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात असे मत नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत तळेगाव येथील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतिने संस्थेतील पवना विद्या मंदिर, पवनानगर, श्री.एकविरा विद्या मंदिर कार्ला, नवीन समर्थ विद्यालय तळेगाव,परांजपे विद्या मंदिर तळेगाव, प्रगती विद्या मंदिर इंदोरी, श्री.छत्रपती शिवाजी विद्या मंदिर, कान्हे , सर्व प्राथमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व इंजिनिअर कॉलेजमध्ये जाऊन तेथील ज्ञानदानाचे काम करत असलेल्या सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला
यावेळी संतोष खांडगे बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे संचालक व एकविरा विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा उपस्थित होते.
पुढे बोलताना खांडगे म्हणाले जसा आपण संस्था आपल्या दारी उपक्रम राबवत आहे त्याप्रमाणे कोरोना प्रादूर्भावामुळे शाळा बंद आहे यासाठी शिक्षकांनी देखील वाड्या वस्त्यांवर जाऊन शिक्षक आपल्या दारी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचावे असे आहवान शिक्षकांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले सुत्रसंचालन भारत काळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका निला केसकर यांनी मानले.

error: Content is protected !!