आंद्रा फार्म वर इंद्रायणी इंग्लिश स्कूलची सहल
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील कोंडिवडे ब्रीज जवळच्या आंद्रा फार्म वर तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांची निसर्ग शैक्षणिक सहली घडली. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या निसर्ग सहलीत शिक्षकांनी नवचैतन्य अनुभवले.
निसर्गरम्य, हिरवाईने नटलेले हे फार्म हाऊस आहे. जिथं आपल्या आपल्या आपुलकीची आणि घरची माणसं मिळतील. घरा सारखे घरपण जपणारी आणि माहेरा सारखे माहेर वाटणारं हे आंद्रा फार्म आपलंस फार्म वाटत.
येथे राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था असलेले तसेच बोटिंगची व्यवस्था असणारे हे फार्म शिक्षकांना खूपच भावले.आंद्रा फार्महाउस इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांसाठी आकर्षण ठरले.शिक्षक दिनानिमित्त या शाळेने सर्व शिक्षकांना आंध्र फार्महाऊसवर सहलीसाठी
आणले होते.
तेथे सर्व शिक्षकांनी आणि उपस्थित असलेले संस्थापकांनी तसेच सहलीचे नियोजन बघणारे सर्व सभासद तेथील निसर्गाचा आस्वाद घेत, शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा केला.फार्महाउस सर्व सोयींनी सज्ज असल्यामुळे तसेच निसर्गाने हिरवाईने नटलेले असल्यामुळे दिवसभर सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत होता.
विविध कार्यक्रमांसाठी उपयोगी पडणारा हॉल आवश्यक असणारी सर्व साधने तसेच, तत्परतेने सेवा पुरवणारे कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित
केला त्यामुळेच उपस्थित राहिलेल्या सर्वांनाच विविध खेळांचा आस्वाद घेता आला.

error: Content is protected !!