पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि डॉ.डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान चिंचवडगाव,प्रेमलोक पार्क,उद्योगनगर,भाजी मंडई,बस स्टाॕप या परिसरात राबविण्यात आले.
परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव कसा करावा याविषयी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आणि संस्कृती कड शालेय विद्यार्थीनी यांनी गणेश भक्तांना ही माहिती दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याच उद्देशाने या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा,गणेशमुर्ती शाडूमातीचीच घ्यावी आणि आकाराने लहान असावी.प्लास्टर आॕफ पॕरिस पाण्यात विरघळत नाही त्यावरील कलर केमिकल्सचे असल्याने पाणी प्रदुषीत होते गणपतीच्या सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या हार फुलांचा व थर्माकोलचा वापर करु नका खरेदीसाठी प्लॕस्टीक कॕरीबॕग ऐवजी कापडी पिशवीचा वापर करा.
गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या गणपतीचे विसर्जन घरच्या घरीच करा.शक्यतो विसर्जन स्थळी गर्दी करु नका,लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना गणेश विसर्जन स्थळी नेऊ नका असे गणेशभक्तांना आवाहन करण्यात आले.खजिनदार मनोहर कड,रुपाली कड,संमिक्षा कड,रमेश भिसे आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!