टाकवे बुद्रुक :
शिक्षकदिना निमित्त टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जरक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक हे भावी पिढीतील शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले यांनी सांगितले.
यावेळी दत्तात्रय असवले, दिलीप आंबेकर, बाबाजी असवले, सुशील वाडेकर, शंशाक खोडे उपस्थितीत होते.

error: Content is protected !!