
तळेगाव स्टेशन::
निगडे येथील दर्शना श्रीकांत शेजवळ या विद्यार्थीनीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी मधे फर्स्ट क्लास रॅंक मिळवत
इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयामधुन 87.30% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिच्या या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
अतिशय ग्रामीण भागातून आणि शैक्षणिक प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत जिद्द आणि चिकाटीने
केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याने सर्व कुटुंबाला व ग्रामस्थांनां आनंद आहेच, तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.निगडे येथे मराठी माध्यमातून ती शिकली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण आणि प्रतिक विद्यानिकेतन मधुन तिने माध्यमिक शिक्षण घेतले .
उच्च माध्यमिक शिक्षण इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव येथे घेऊन बारावी नंतर इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयामधेच डी.फार्मसी करत पहिल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवत सलग दुसऱ्या वर्षी ही तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
कुठल्याही साधन सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा शिक्षणात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी पडत नाही.हेच यातून सिद्ध होते.ग्रामीण भागातील विद्यार्थिनी जिद्द चिकाटी बाळगली तर यश खेचून आणता याचे याचा पायंडा दर्शनाच्या यशात पडला आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


