वडगांव मावळ:
गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या संकल्पनेतून देवनागरी भाषेचे संवर्धन होऊन शास्त्रीय दृष्ट्या लेखन विध्यार्थ्यांना कसे अवगत व्हावे, त्याचा दैनंदिन अभ्यासात वापर केला जावा यासाठी सुलेखन प्रशिक्षण आयोजित केले गेले.
प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती मावळचे शिक्षण विस्तार अधिकारी रामराव जगदाळे , कडधे शाळेचे मुख्याध्यापक गणेश कदम,तज्ञ मार्गदर्शक ज्ञानेश्वर शिवणेकर, प्रज्ञा माळी व कडधे केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आदी उपस्थित होते.
अक्षरातील वळण,सुंदरता,बारकावे यावरून व्यक्ती स्वभाव देखील परिचित होतो,लेखनातील बारकावे कसे सुधारावे याविषयी रामराव जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक ज्ञानेश्वर शिवणेकर व प्रज्ञा माळी यांनी प्रत्यक्ष कृतीतून हस्ताक्षरातील बारीकसारीक बाबी यांविषयी मार्गदर्शन केले.बोरुच्या साहाय्याने लेखन करताना प्रशिक्षणार्थी शिक्षक आनंदून गेले. या कार्यशाळेत कडधे केंद्रातील सर्व शिक्षक सहभागी झाले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आडकर यांनी तर आभार धनंजय नवले यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन बेडसे शाळेचे मुख्याध्यापक संदीप आडकर, शिक्षक अनिल गिरीगोसावी यांनी केले..

error: Content is protected !!