सोमाटणे:
येथे पद्मावती रिक्षा संघटनेचे उद्घाटन तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संतोष भेगडे, पद्मावती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष व सोमाटणे ग्रामपंचायतीचे सदस्य शैलेश मुऱ्हे , सदस्य नितीन मुऱ्हे ,माजी सरपंच राकेश मुऱ्हे, माजी उपसरपंच नवनाथ मुऱ्हे,पवन मावळ राष्ट्रवादी माजी अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर ,युवा नेते बाळासाहेब घारे, उद्योजक बाळासाहेब मुऱ्हे व पद्मावती रिक्षा संघटनेचे सर्वं सभासद उपस्थित होते.एकता प्रतिष्ठाण डोणेचे संस्थापक- श्री.बाळासाहेब घारे यांनी सुत्रसंचालन केले.अध्यक्ष शैलेश मुऱ्हे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!