वडगाव मावळ:
येथील आफताब सय्यद यांच्या La fabrica exteriors या नुतन ऑफिसचा उद्घाटन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते झाले.
अल्पसंख्यांक विकास,कौशल्य विकास या विभागांमार्फत युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. अल्पसंख्यांक समाजासाठी असणाऱ्या शासकीय योजना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यात राबवाव्यात. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम ज्याप्रमाणे राबविला, त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शेळके यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले.
मावळमध्ये राबवित असलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाचे कौतुकही केले.यावेळी आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, सुभाषराव जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती बाबुराव वायकर, नगरसेवक गणेश खांडगे,नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा पूजा वहिले, नगरसेविका वैशाली दाभाडे,पूनम जाधव, तुकाराम ढोरे,देहुरोड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे, प्रवीण ढोरे, राजेश बाफना, प्रविण झेंडे, अतुल राऊत, विशाल वहिले, .बाबुलाल नालबंद, सोमनाथ धोंगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!