वडगाव मावळ:
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास ,कौशल्य व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांचा मावळचे आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्काराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल काल पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आज मंत्री नवाब मलिक मावळ दौऱ्यावर आले असता,वडगाव मावळ येथे सरपंच भूषण असवले यांनी मलिक यांना ग्रामपंचायतींच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार सन-२०२०/२०२१ प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला या बद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सरपंच असवले यांचे अभिनंदन केले.
दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवदारे,कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या सह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत असवले यांचा सत्कार झाला होता. तर मागील आठवड्यात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते हा पुरस्काराबद्दल प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायत पदधिका-यांना गौरविण्यात आले होते.
वडगाव मावळ येथील सदिच्छा भेटीत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या सह आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी सरपंच असवले यांचे अभिनंदन केले. यावेळी अरूण काटकर उपस्थितीत होते.                                     

error: Content is protected !!