

लोणावळा :
मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या लहान बहिणीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ध्वनी मनीष ठक्कर (वय १८, रा. रामबाग मनुभाई चाळ, पवई, कुर्ला, मुंबई) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ध्वनी तिच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बहीण व मैत्रिणीसोबत शुक्रवारी लोणावळ्यात आल्या होत्या. दुपारी त्या लोणावळ्यातील तुंगार्ली धरणाकडे फिरायला गेल्या व त्याठिकाणी बहिणीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर धरणाच्या पाण्याच्याकडेला मौजमस्ती करत होत्या. ध्वनी हिला येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली.
ध्वनी बुडू लागल्याने
तिच्या बहिणींनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिकांच्या मदतीने ध्वनीला बाहेर काढण्यात यश आले. तिला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत घोषित केले.शवविचेछदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.






- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे