टाकवे बुद्रुक:
मावळ मध्ये 2015 ला टाकवे बुद्रुक येथे मावळ दूध डेअरीची स्थापना करण्यात आली ,ज्यामध्ये परिसरातील 1200 महिला सभासद शेअर भागधारकांच्या माध्यमातून व 12 महिला संचालकाच्या मार्गदर्शनाखाली दुग्ध प्रकल्प याठिकाणी सुरू झाला.
कोरोना काळात अडचणीत आलेल्या मावळ दूध डेअरीने दुग्ध व्यवसायकांचे एक वर्षाचे जवळपास दुधाचे 65 लाख रुपये बिल देणे बाकी आहे. त्या अनुषंगाने आज काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मावळ डीअरी या ठिकाणी मावळ दूध डेरीचे संचालक मंडळ, ए. एल. सी. कंपनी मॅनेजमेंट व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची चर्चा झाली. परंतु दुधाचे बिल कसे देणार यावरती चर्चेमधून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी व मावळ दूध डेअरी यांच्यात वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
मावळ दूध डेअरी, टाटा पॉवर, ए.एल.सी. या तिघांनी एकत्रित येऊन आपापसात तडजोड करून आमचे थकीत बिल देणे. तसेच आम्हाला बिल न भेटल्यास येत्या काही दिवसात आंदर मावळ मधील सर्व 1200 महिला शेअर भागधारकांना एकत्रित घेऊन मावळ डेअरी टाकवे बुद्रुक या ठिकाणी मोठ्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास कंपनी व्यवस्थापन व संचालक मंडळ जबाबदार राहतील असा आक्षेप स्थानिक शेतक-यांनी घेतला.
मावळ दूध डेअरी मधून बाहेर दूध वितरक होत असताना त्या संबंधित डेअरींकडून लाखोंच्या घरात बिले येणे बाकी आहे, तसेच काही डेअरीचे चेक बाऊन्स झाल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती न्यायालयामार्फत केस दाखल केलेली आहे. तसेच ए.एल.सी. कंपनीचा करार संपण्याच्या अगोदर कंपनीने पन्नास लाखांची उधारी करून ठेवली आहे.कंपनीने हात वरती करून बाजूला झाल्यामुळे या दोन्ही कारणाने दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे बिल देणे शक्य होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष संचालक मंडळांवरती वडवत आहे, असे मावळ दूध डेअरी अध्यक्ष भारती शिंदे,उपाध्यक्ष राधा जगताप यांनी सांगितले.
ए. एल. सी. कंपनी व्यवस्थापन सांगितले की,”
मावळ दूध डेअरीने हा प्रकल्प आम्हाला सुरु करण्यासाठी देऊन संपूर्ण अधिकार आम्हाला देणे. एग्रीमेंट करून दिल्यानंतर ज्या दुग्ध शेतकरी व्यवसायिक यांचे बिल थकीत आहे ते पूर्ण बिल देण्यास आम्ही बंधनकारक राहू. दूध डेअरी वरती दहा कोटी असलेल्या कर्जा संदर्भात देखील चर्चा करून प्रश्न सोडवू. तसेच मावळ दूध डेअरी यांची बोरीवली येथे असलेली कंपनीची दोन एकर जागा आम्हाला विकत देणे. ह्या सर्व आठी मान्य असेल तर सर्व गोष्टीवरती तोडगा निघू शकतो.
तसेच मावळ डेअरी जागा खरेदीसाठी ते सर्व प्रकल्प पूर्ण होई पर्यंत ए.एल.सी. कंपनीने अगोदरच दहा कोटीचे लोन मावळ दूध डेअरीला दिलेले आहे. तरीदेखील ए.एल.सी.कंपनीने प्रकल्प सुरु करण्याची अनुकूलता दर्शवली आहे.ए.एल.सी. कंपनीचे मॅनेजर यांनी शेतकरी व मावळ डिअरी यांच्याशी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!