लोणावळा:
शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमने क्लायबिंग मोहीम आखली आहे. .हिमाचल प्रदेशातील सांगला व्हॅलीतील ४७०० मीटर वरील सोशाला पिक शिवदुर्ग टीम क्लायबिंग करणार आहे. भारतातून ही सोशाला क्लायबींगसाठी पहिलीच क्लायबींग मोहीम असणार आहे.
या पुर्वी परदेशी गिर्यारोहकांनी २०१० मध्ये ही मोहीम यशस्वी केली होती . शिवदुर्ग टीम मोहिमेला जाण्यापूर्वी शिवदुर्गचे संस्थापक वि.का.गायकवाड यांना भेटून सविस्तर माहिती दिली व आशिर्वाद घेतले.
शिवदुर्ग कोणत्याही मोहिमेवर जाताना पद्मविभूषण, महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशिर्वाद व मार्गदर्शन घेतात. शिवदुर्गची महत्वकांक्षी मोहीमेसाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे टीमने आशिर्वाद घेतले.
त्याप्रसंगी काही दाखले हिमालयातील गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या ,लढाया साठी महाराष्ट्रातून गेलेले योध्दे या बाबत माहिती दिली. तसेच संत नामदेव , निवृत्ती , सोपान ,मुक्ताआई , ज्ञानेश्वर व समर्थ रामदास असे अनेक संत यांचाही त्याभागात प्रवास झाल्याच्या नोंदी, तसेच बाबासाहेबांनी स्वतःचे हिमालयातील अनुभव सांगितले.
टिमचा उत्साह वाढवत. येणारी संकटे व त्यायबाबत घ्यायची काळजी यांचा कानमंत्र सांगितला. अत्यंत धाडसी मोहिमेला येण्याची इच्छा सुध्दा वयाच्या शंभरीत व्यक्त केली.शिवदुर्गची सोशाला मोहिमेची टीम
सचिन गायकवाड सर ( लिडर),
रोहीत वर्तक, योगेश उंबरे, समीर जोशी, ओंकार पडवळ, भुपेश पाटील, शिवम आहेर उपस्थित होते.

error: Content is protected !!