सोमाटणे:
घरातील टिव्ही रात्रभर का चालू ठेवला या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील चांदखेड येथे घडली. सहा महिन्याची चिमुकली पोरकी झाली. किरकोळ वादाने खून पर्यत मजल मारल्याने चांदखेड परिसर हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  चांगुणा योगेश जाधव (वय २० वर्ष) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. पती योगेश हा चांगुणाला बाळंतपणात पहिली मुलगी का जन्माला घातली म्हणून तिचा छळ करत होता. टिव्ही चालू राहिला या वादाला छळाची किनार असल्याचे बोलले जाते.
आरोपी योगेश ला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यावर फौजदारी कारवाई होईल. कायद्याने त्यावर गुन्हा दाखल होईल. पण सहा महिन्याच्या लेकराचा काय दोष ज्याच्या नशिबी आईची माया हरपली. या घटनेची हळहळ होती,तितका संताप व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!