मुबंई:
दहीहंडी भगवान श्री कृष्ण यांच्या काळापासून अवघ्या हिंदूस्थानात साजरा करण्यात येणारा पवित्र आणि महत्त्वाचा सण. अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय असा सण आहे महाराष्ट्रात दहीहंडी साजरी करण्या साठी अनेक गोविंदा पथक आहे. असच एकापथकांपैकी एका पथका बद्दल आपण जाणून घेऊ.
‘शिवस्वराज्य गोविंदा पथक’ मुंबई सारख्या स्पर्धेने भरलेल्या शहरात आज शिवस्वराज्य गोविंदा पथकाने आपली एक वेगळी ओळख आणि वेगळ स्थान निर्माण केले आहे. शिवस्वराज्य गोविंदा पथका मध्ये सर्व जाती-धर्माची तरूण पिढी कार्यरत आहेत. पथकात १०० हून अधिक सदस्य आहेत.
मावळ आणि खेड भागातील तरूणांनी एकत्र येऊन मुंबई तील ओशिवरा(आनंद नगर) ह्या ठिकाणी पथकाची स्थापना केली. अनेक मुल एकत्र करून पथक स्थापन झाले. पथकाची सुरवात संघटने मुळे झाली आणि ती संघटना म्हणजे शिवस्वराज्य संघटना.
शिवस्वराज्य संघटना ही तरुणांची संघटना आहे.
विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणे, महाराष्ट्र भर मोठे संघटन करणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट शिवस्वराज्य संघटनेची आहे. शिवजयंती, गणेशोत्सव, दहीहंडी तसेच इतर पवित्र सण शिवस्वराज्य संघटना जल्लोषात साजरा करते.
समाजासाठी काही तरी करणे हे ध्येय शिवस्वराज्य संघटनेचे आहे आणि त्या साठी शिवस्वराज्य संघटनेला गरज आहे आपल्या पाठिंब्याची आणि माय-बाप जनतेच्या आशीर्वादाची. जनसेवेचे व्रत घेतलेल्या या पथकाने मुंबापुरीत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. तेही प्रसिद्धी पासून दूर राहून.
मावळ आणि खेड तालुक्यातील खेड्या पाडयातील तरूणाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या संघटनेत कार्यकर्त्याचा गोतावळा वाढत चालला आहे. सामूहिक पण राबवलेल्या अनेक कामामुळे त्याच्यावर कौतुकाची पडलेली थाप हेच आमचे बळ असल्याचे हे कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. कोरोनाच्या महामारीत सणासुदीला निर्बंध आहेत. त्यामुळेच प्रत्यक्ष मैदानात वावर कमी असला तरी आमच्या संघटनेच्या सामाजिक बांधलीकीची पाळमुळे खोलवर रूजली आहेत. हेच आमचे वैभव असल्याचे ही मंडळी सांगतात.

error: Content is protected !!