मुंबई: स्वरानंद विश्व संगीत विद्यालयाच्या पुढाकाराने विठु माऊली प्रतिष्ठान आयोजित कांदिवली मुंबई येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.दीप प्रज्वलित करण्यासाठी शिवसेना नगरसेविका सौ.संध्या विपुल दोशी (शिक्षण समिती अध्यक्षा), नगरसेविका सौ.संगीता सुतार (प्रभाग समिती अध्यक्षा ), अभिनेता हरिओम घाडगे,गायन अलंकार बाळासाहेब वायकर,गायन अलंकार भाग्यश्री देशपांडे, प्रकाश कुटे (समाजसेवक) सचिन भाऊ शिंदे(मावळ प्रतिष्ठान अध्यक्ष)व‌ अन्य मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन, सरस्वती पूजन दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या गुरूपौर्णिमेचे एक वैशिष्ट्य ठरले ते मागाठाण्याचे आमदार श्री.प्रकाश दादा सुर्वे यांनी गुरूवर्य ह.भ.प.बंडाराज महाराज घाडगे यांना चांदीचा पखवाज म्हणून रोख रक्कम १लाख रू. दिले.
स्वरानंद विश्व संगीत विद्यालया चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण कोकण रत्न तालमणी पुरस्कृत मृदंगाचार्य ह भ प श्री बंडाराजजी घाडगे महाराज यांच्या संकल्पनेतून ,कर्तृत्वातून ,कलेतून आज शेकडो तरुण मुले आज या कलयुगात सांप्रदायिक वाद्य पखवाज ,तबला वाजविण्यात परांगत झालेली आहेत आजच्या या कलियुगात देखील श्री बंडाराजजी घाडगे महाराज माऊली यांच्या सहवासात राहिल्यामुळे युवा पिढीला देखील सांप्रदायाची आवड निर्माण झाली आहे कित्येक मुले मुली या सांप्रदायात पांडुरंगाची सेवा करत करत आपले करिअर देखील करत आहेत घाडगे महाराज्यांच्या बोटांमध्ये इतकी जादू आहे की किर्तनसोहळ्या मध्ये वारकरी त्यांनी दिलेल्या पखवाजाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत असतात आज घाडगे महाराज यांना मोलाची साथ त्यांच्या सौभाग्यवती आरती ताई यांची सुरेख साथ लाभली आहे , सुंदर अशा गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाला श्री.प्रकाश दादा सुर्वे (आमदार मागाठाणे),श्री.किशोर काकडे साहेब (काक इकोनॉमिक कुटुंबप्रमुख),श्री.रविभाऊ मुंडे (महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा),सौ.संध्या विपुल दोशी (नगरसेविका),श्री.राजन‌ निकम (उपविभाग प्रमुख), श्री.हरिओम घाडगे (अभिनेते),श्री.राजेश पार्टे (महाराष्ट्र का.से.सचिव),श्री.प्रणय दरेकर(संगीतकार व वादक),श्री.अरविंद साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरूपौर्णिमेच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरानंद संगीत क्लासचे अध्यक्ष श्री.रामदास बाबा शिंदे यांनी केले.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावाचं नावलौकिक करणारी औंढे गावची कन्या कु.करिष्मा रामदास शिंदे,कु.हर्षद कावडे,मावळ तालुक्यातील कु.अभिषेक रामदास यादव तसेच कु.प्रसाद पालवे अनेक जिल्ह्यातील मुले‌ महाराजांकडे पखवाज वादन शिकत आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी आपली अतिशय छान वादन कला करून या कार्यक्रमाला आकर्षित केले.

error: Content is protected !!