टाकवे बुद्रुक:
सुसंस्कृत कुटुंबातील एक संयमी आणि जेष्ठांचा आदर करणारं युवा कार्यकर्ता निलेश आलम प्रचंड शांत आणि तितकाच संयमी कार्यकर्ता . गावच्या कारभारात पणजोबा कै.पांडुरंग मळीबा आलम यांचे म्हणत्वपूर्ण योगदान लाभलेले संस्कार,आजोबा श्री.मुगुटराव आलम यांचं शेतकरी कुटुंबातील वावरत असताना एकमेकांना मदतकार्य करण्याचा वारसा त्याला लागला.
शेतीला लागणाऱ्या भांडवलासाठी नोकरीची कास धरणारे वडील श्री.बबनराव आलम यांच्या कडून मिळालेलं सामान्यज्ञान, मुळशी प्रांतातील वाळेण या गावच्या शेतकरी आणि एकत्र कुटुंब असलेल्या घरातील कुटुंबवत्सल थोड्या कडक शिस्तीच्या व मनमिळाऊ आई सौ.लताबाई यांचे वेळो वेळी लाभलेले संस्कार, साठे कुटुंबाला नेहमी अभिमान असणारा हा लाडका भाचा, त्याचबरोबर नुकत्याच लग्नगाठ बांधून सहचारिणी झालेल्या धर्मपत्नी सौ.धनश्री यांची प्रापंचिक साथ लाभत असताना या तरुणाने आपल्या स्वकर्तृत्वाने गावात एक आगळ-वेगळं अस्तित्व निर्माण केलं.
समाजामध्ये या तरुणांची समंजस,हुशार,संयमी,एकनिष्ठ म्हणून एक अनोखी ओळख आहे.
स्वकर्तुत्वाच्या जोरावर आपल्या उर्वरित दोन्हीं भावंडाना शिकवून योग्य कुटुंबातील यथोचित संस्कार देऊन त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचं या तरुणाकडून नेहमी कानी येत.
स्वतः पेक्षा आपली माणसं मोठी व्हावी यात आनंद शोधणारी या तरुणासारखी माणसं खुपच तुरळक आहेत.
या तरुणाचं आज अभिष्टचिंतन आहे.या महत्वपूर्ण दिनाच्या या नवतरुण आणि विचारकौशल्य दांडगं असणाऱ्या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
( शब्दांकन : सुभाष आलम (गडकल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)

error: Content is protected !!