तळेगाव दाभाडे:
शेतीशी जोडलेली नाळ आणि घरचा राबता यातून सामाजिक कार्याची जडणघडण झाली. आणि गावक-यांनी फार कमी वयातच त्याला संधी दिली. जेव्हा तरूण पिढी राजकारणाला दुरून डोंगर साजरे म्हणायचे तेव्हा हा तरूण गावच्या राजकारणात सक्रिय झाला. आणि तरूण पिढीही राजकारणात तग धरू शकते हा आत्मविश्वास या तरूणाने युवा पिढी समोर ठेवला. अनेक तरूणाच्या राजकीय आशाआकांक्षा पल्लवित केलेल्या या तरूणाचे नाव नवलाखउंब्रेतील संतोष नरवडे.
हा तरूण वयाच्या एकविसाव्या वर्षी नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीत वीस वर्षांंपूर्वी दोनशे मतांनी विजयी झाला. या विजयाचा धूराळा खाली बसतो ना बसतो तोच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत संचालक म्हणून निवडून आला,तेही सर्वाधिक मताने. शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणा-या सहकारी संस्थेत चौदा वर्षे त्याने काम केले.
सहकारमहर्षी माऊली भाऊ दाभाडे, आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे यांचे कट्टर समर्थक असलेले संतोष नरवडे यांनी बागायती शेती सोबत व्यवसायात आपले चांगले बस्तान बसवले.
नवलाखउंब्रेतील वाढती रहदारी पाहून संतोषने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. यात जम बसवून हा तरूण लॅण्ड डेवलपमेंटच्या कामातही अग्रेसर आहे. व्यवसायात यश मिळाल्यावर समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून या तरूणाचे काम चालूच राहिले.
स्वयंभू श्रीराम देवस्थान समिती उत्सव समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षण समिती अध्यक्ष ,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालक, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष,मावळ तालुका शिक्षण समिती सदस्य अशा अनेक पदांच्या बिरुदावली मिळणारा हा तरूण मित्रांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. हा सगळा लेखन प्रपंच करायचा हेतू एकच या या जीवा भावाच्या मित्राचा आज वाढदिवस आहे. मित्रा सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
(शब्दांकन- राज खांडभोर, संचालक मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था)

error: Content is protected !!