पवनानगर :नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य कै आण्णासाहेब विजापूरकर यांच्या जयंतीनिमित्त पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलातील इयत्ता दहावी , बारावी वाणिज्य व कला शाखेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात गुरुवर्य आण्णासाहेब विजापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली.
गुरुवर्य कै आण्णासाहेब विजापूरकर यांच्या कार्याची माहिती अमोल जाधव यांनी सांगितली .
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी अमित कुंभार म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपल्या आई वडिल व आपल्या शाळेचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे.
यावेळी काले पवनानगर सरपंच खंडुजी कालेकर,उपसरपंच अमित कुंभार,सदस्य रमेश कालेकर,पवना शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर,शाळेच्या प्राचार्या अंजली दोंडे,पर्यवेक्षिका निला केसकर,शिक्षक प्रतिनिधी राजकुमार वरघडे, कॉलेज प्रतिनिधी वैशाली पाटील, बापूसाहेब पवार,सुनिल बोरुडे,मोहन शिंदे, गणेश ठोंबरे, संदिप शिवणेकर, प्रतिभा ढमढेरे, संतोष टाकवे आदी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत काळे तर आभार सुनिल बोरुडे यांनी तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली वराडे व रोशनी मराडे यांनी केले.

error: Content is protected !!