टाकवे बुद्रुक:
बालपण पुण्यात गेले तरी शिक्षणांचा गंध नाही,पण सासरी मुर्ती कलेचा व्यवसाय असल्याने या व्यवसायात पडले आणि तो नेटाने करू लागले यात पतीराजांची मोठी साथ लाभली,असे टाकवे बुद्रुक येथील मुर्ती कलाकार अनिता दत्तात्रय कुंभार यांचे म्हणणे.
गणेशोत्सव तोंडावर आला आहे,लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सगळ्यानाच आस लागली आहे. घरोघरी गणरायाच्या आणि त्या पाठोपाठ येणा-या गौराईच्या मुर्तीत रंग भरण्याच्या कामावर शेवटचा हात फिरवला जातोय. या कामाचा कोणताच अनुभव पाठीशी नव्हता.
पण जस पाण्यात पडल्यावर पोहता येते तसे, हातात ब्रश घेऊन रंग भरण्याच्या कामाला सुरूवात केली. सुरूवातीला हाताचा थरकाप होयचा.
कधी रंग चुकायचे पण रोजच्या सरावातून आणि अनुभव शिकत राहिले आज या गोष्टीला पंचवीस वर्षे झाले. या कामात मी तरबेज झाले. कोरोनात किमतीही वाढल्या,तरीही आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर आमचा व्यवसाय सुरू आहे. बाप्पा लवकर कोरोनाचे संकट दूर होऊदे असे साकडे प्रत्येक मूर्तीला रंगकाम करताना आम्ही नवस करीत असल्याचे अनिता दत्तात्रय कुंभार आणि दत्तात्रय ज्ञानेश्वर कुंभार यांनी सांगितले.
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु झाली आहे. टाकवे येथील वडिलोपार्जित असलेला व्यवसाय गणपती मूर्ती बनवून वेगवेगळ्या पेंटिंग चे काम करताना फार आनंद आणि समाधान होत असल्याचे दत्तात्रय ज्ञानेश्वर कुंभार यांनी सांगितले.
अनिता दत्तात्रय कुंभार अशिक्षित महिला त्यांचे माहेर संगमनेर त्याचे माहेरी शेती .त्यांचे बालपण पुणे शहरात गेले. पण शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या भगिनी आपल्या कामात तरबेज आहेत. या कामात त्याचा मुलगा सोहम हातभार लावतो तो पाचवीत शिकतो. ज्ञानेश्वर अनंता दळवी, ज्ञानेश्वर दळवी, रेणुका भरत असवले हेही मोठ्या आवडीने रंगकाम करीत आहेत.
दत्तात्रय कुंभार यांनी बोलताना सांगितले आमचे दुकान सोहम कला केंद्र टाकवे बुद्रुक याठिकाणी एका मूर्तीस पूर्ण आकार व कलर देण्यासाठी कमीत कमी तीस ते पस्तीस वेळा हाताखालून घालावे लागत आहे. त्यामध्ये सतत लाईटचा खोळंबा होत असल्यामुळे गणपतीची अनेक कामे पेंडिंग राहिलेली आहेत. तरी गणपतीच्या काळामध्ये लाईट पूर्ववत राहावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
गणपतीची पेंटिंग स्वतः आम्ही घरी करीत असल्यामुळे या ठिकाणी पंचक्रोशी मधून अनेक नागरिक लहानांपासून ते थोरांपर्यंत या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. आमच्याकडील प्रत्येक मूर्ती त्यांना पसंत पडत आहे ग्राहकांनाच विचार पडतो की या मधील कोणती घेऊयात. मूर्ती बुकिंग केल्याशिवाय या दुकानात आलेला नागरिक माघारी जात नाही. हि सोहम कला आर्ट दुकानाची खासियत आहे.
आमच्याकडे लहान मूर्ती पासून ते चार फुटापर्यंत च्या मूर्ती आहेत मोठाल्या मूर्तींसाठी अनेक मंडळांच्या ऑर्डर बुकिंग झालेल्या आहेत, गणपती बाप्पाचे आगमन थोड्याच दिवसात येत असल्यामुळे कामाची लगबग अतिशय जोर धरू लागली आहे. असे मूर्ती पेंटिंग कार दत्तात्रय कुंभार यांनी बोलताना माहिती दिली.

error: Content is protected !!