वडगाव मावळ:
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरील अक्षेपार्ह वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मध्येच सोडून महाराष्ट्र पोलीसांनी राणे यांना अटक करण्यात आली. केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची महाराष्ट्रातील ही पहिली घटना.राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्या बाहेर कार्यकर्त्याची घोषणा बाजी.
राणे स्वतःच्या गाडीत बसले त्याच क्षणी पोलीस त्याच गाडीत बसले आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात राणे यांना घेऊन पोलीस घेऊन गेले. यावेळी भाजपचे नेते प्रसाद लाड उपस्थितीत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी, नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल. कारण, त्यांनीच राणेंना मंत्री केलं आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत, असे चित्र निर्माण होईल, असेही जयंत पाटील म्हटले आहे.
मुंबईमध्ये फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या वक्तव्याचं आम्ही पक्ष म्हणून समर्थन करणार नाही पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेंच्या मागे ठाम उभे आहोत असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच राज्यभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांसंदर्भात बोलताना फडणवीस यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड सहन केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. “भाजपाच्या कार्यालयांवर हल्ला केला तर खबरदार, ते सहन केलं जाणार नाही,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आंदोलकांना इशारा दिलाय. “आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही, उद्या आमच्या कार्यालय हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर दोन्ही विरोधी पक्षाचे नेते त्या आयुक्तालयांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करु,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांचे वकील अनिकेत निकम म्हणाले, अशा गुन्ह्यात तातडीने अटक करता येत नाही,आम्ही योग्य ठिकाणी दाद मागू.भाजपा कार्यकर्ते आक्रमक. संगमेश्वर परिसरात घोषणाबाजी. सरकार विरूद्ध भाजपाची नारेबाजी.

error: Content is protected !!