कामशेत:
यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही सात वर्षापासून तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनानंतर ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत,आता पर्यत हजारो ग्राहकांनी विश्वासाने युवियाला आपले केले आहे. हजारो ग्राहकांच्या पसंतीला पडलेल्या यूवियाच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर महावीर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे आपणाला मिळणार आहे,कामशेतच्या महावीर हाॅस्पिटल मध्ये एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेश आरोग्य सुविधा. तीही अगदी मोफत.
यूवियाची वस्तू खरेदी करणा-या आमच्या ग्राहकांच्या वर्षभरासाठी आम्ही एक लाख रूपये खर्च पर्यंतच्या हॉस्पिटलचा कॅशलेश खर्च आम्ही करू असे आवाहन यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा यांनी केले. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. स॔साराची आर्थिक गणिते कोलमडून पडली आहे. कोरोनाचे संकट कमी होते ना होते तोच,साथीचे आजार आपल्या मानगुटीवर बसू पाहत आहे.
थंडी ताप या आजारात खिशाला झळ बसते त्यात वाढती महागाईने आपण बेजार झालो आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून महावीर इलेक्ट्रॉनिक्सने यूवियाच्या ग्राहकांना आरोग्य सुविधा देऊ केली आहे. आपल्या सह कुटूंबातील चार जणांचा एक लाख रुपये पर्यत कॅशलेश उपचार महावीर हाॅस्पिटल मध्ये करण्याची तयारी महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे परेश मुथा यांनी दर्शवली असून आपल्या ग्राहकांना या संधीचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय आम्ही आपणाला देत आहोत तीन वर्षाची वाॅरंटी,आमच्या वस्तूत बिघाड झाल्यास घेऊन जा नवी कोरी करकरीत वस्तू तीही मोफत,असे थेट आवाहन यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा यांनी केले आहे.
कमी कमी पैशात आमच्या ग्राहकांना दर्जेदार वस्तू देण्याचा आमचा संकल्प आहे,आम्ही नुसता विश्वासच नाही तर खात्री देत आहोत,तुम्ही एक टिव्ही,फ्रीज आपल्या कडून खरेदी केला, तर तुमच्या प्रियजनांच्या आनंदच्या प्रसंगी तुम्हाला महावीर इलेक्ट्रॉनिक्सची आठवण येईल असेही परेश मुथा यांनी सांगितले. यूविया सह सोनी,सॅमसंग,एलजी, व्हिडिओकाॅन,ओपो,विवो,अॅपल या सारख्या बॅण्डेड कंपनीच्या वस्तूही येथे विक्रीला असतील. लवकरच आमच्या मावळ तालुक्यातील सर्वात मोठया शोरूमचे दालन आपल्या साठी खुले होणार असून,खरेदीवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे,शिवाय भेटवस्तूही,या सुवर्णसंधीचा लाभ घेत आजच आमच्या शोरूमला भेट द्या असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा व यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ परेश मुथा यांनी केले आहे.

error: Content is protected !!