वडगाव मावळ:
पर्यटन संचलनालय, पंचायत समिती मावळ, कृषी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील शेतकरी बांधव व युवकांसाठी कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
सोमवार दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजता रायकर फार्म, गोवित्री, ता. मावळ येथे हे प्रशिक्षण होणार आहे.
माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.सभापती ज्योती नितिन शिंदे, उपसभापती दत्तात्रय नाथा शेवाळे, उपसंचालक,पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर,कृषि पर्यटन तज्ञ, प्रशिक्षक पर्यटन संचलनालय मनोज हाडवळे मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य जिजाबाई पोटफोडे , पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार, पंचायत समिती सदस्य ,साहेबराव कारके, पंचायत समिती सदस्य निकीता घोटकुले, पंचायत समिती सदस्य , महादु उघडे , पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत, गटविकास अधिकारी सुधीर भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये कृषि पर्यटन संकल्पना, कृषि पर्यटन व्यवस्थापन व नियोजन ,कृषि पर्यटनातील महत्वाचे घटक, कृषि व ग्रामिण पर्यटनाचे उद्देश , कृषि व ग्रामिण पर्यटनातील संधी , कृषि पर्यटन धोरण २०२०,
, कृषि व ग्रामिण व्याप्ती व विस्तार , कृषि पर्यटन शेतीपूरक व्यवसाय ,कृषि पर्यटन संलग्न विविध योजना
,कृषि पर्यटनासाठी बँक कर्ज या विषयी मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षण मोफत आहे. कोरोना नियमांअभावी प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ४० प्रशिक्षणार्थीनाच प्रवेश दिला जाईल. सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नाव नोंदणी साठी संपर्क: ९४०४९६३९७७
८९८३१५५७६७

error: Content is protected !!