तळेगाव दाभाडे:
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य मावळ विभागाच्या वतीने तसेच गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाने तळेगाव दाभाडे मावळ येथील पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस अधिकारी यांच्या साठी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
आपण सर्व जण घरी बसून आपल्या कुटुंबाबरोबर सण उत्सव साजरे करत असतो पण आपले पोलिस बांधव मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात, आपले सण उत्सव त्यांना साजरा करता येत नाही. त्यांना ही सण साजरे करता यावेत तसेच त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील पवित्र सण असोसिएशन च्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव साहेब, पोलीस निरीक्षक शहाजी पवार साहेब,पोलीस नाईक वाबळे तसेच पोलीस फ्रेंड्स वेलफेअर महाराष्ट्र राज्य चे संस्थापक गजानन भाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा सचिव सुनिलनाना भोंगाडे, मावळ महिला अध्यक्ष रुपाली ताई दाभाडे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे, तळेगाव अध्यक्ष बजरंग रंधवे, लोणावळा अध्यक्ष संजय मांढरे, देहूरोड अध्यक्ष लक्ष्मण शेलार, कामशेत अध्यक्ष चेतन वाघमारे, बाळासाहेब काकडे, सोमनाथ चोपडे, देहूरोड महिला अध्यक्ष हेमा रेड्डी, तळेगाव महिला अध्यक्ष सविता मंचरे, संगीता मु-हे उपस्थित होते.
प्रास्ताविक मावळ महिला अध्यक्ष रुपाली दाभाडे यांनी केले.नाईक पाटील साहेब यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. गजानन चिंचवडे यांनी असोसिएशन च्या वतीने पोलीस बांधवाना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन लक्षमण शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे यांनी केले.

error: Content is protected !!