नशिबाच्या सारीपाठात कष्ट व मेहनतीच्या जोरावरचा उद्योजक : भुषण पोपटराव जाधव
टाकवे बुद्रुक :
भूषण पोपटराव जाधव अगदी कमी वयात घरातील सर्व जबाबदारी यशस्वी त्याने पेलायला सुरुवात केली. ही सर्व जबाबदारी पेलून आज समाजासाठी राबताना दिसतोय.
गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेतलेल्या या तरूणाने आपली अल्पावधीतच पंचक्रोशीत वेगळी छाप पाडली.लहानपणापासून शेतीची आवड असल्याने जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाला सुरवात केली.
बाजारपेठेत १५ वर्षांपासून शंभूराजे मोबाईल शॉपी चालू केला तसेच शंभूराजे वायफाय सर्व्हिस चालू करून तरूणाईला आपलेस केले. वाढत्या औद्योगिकरणाची नाडी ओळखून औद्योगिक क्षेत्रात सेवा चालू केली. औद्योगिक क्षेत्रात आपले नशीब चमकवत स्वतः एक यशस्वी उद्योजक झाला आहे
आपल्या भागातील अनेकांना रोजगार मिळून दिला सर्वाधिक मित्र परिवार सोबत ठेऊन लहान मोठा थोराचे आशिर्वाद घेत आपला व्यवसाय व उद्योग वाढत आहे आशा सतत हासतमुख असणाऱ्या यशस्वी उद्योजकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याचा संघर्ष आणि कष्ट नकळत डोळया समोरून तरळून गेला.

error: Content is protected !!