तळेगाव दाभाडे:
आमदार सुनिल शेळके यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये महेश बेंजामिन यांची तळेगाव दाभाडे अन्न व पुरवठा दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. महेश बेंजमिन हे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस असून आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे खंदे समर्थक आहेत आमदार सुनील आण्णा शेळके यांनी भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या . महेश बेंजामिन यांनी निवडीबद्दल आपल्या सर्व नेतेमंडळींचे आभार मानले.

error: Content is protected !!