कामशेत :
कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवित्री ते कोळवाडी दरम्यान पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजाची तस्करी करणार्‍या वाहनांस पाठलाग करून पकडले आहे. गुरुवारी (ता.१९ ) ला ही कारवाई झाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार,” या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, दत्तात्रय जगताप, सचिन घाडगे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, प्राण येवले हे पेट्रोलिंग करीत असताना गोवित्री गावाच्या जवळ गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोवित्री ते कोळवाडी दरम्यान एका चारचाकी वाहनांमधू गांजा विक्रीसाठी आणला जात आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कामशेतचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस हवालदार अजय दरेकर यांचे मदतीने बंदोबस्त लावला होता. यावेळी एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी ( एमएच १२ जीएस ४१७३) भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात कोळवाडीच्या बाजूकडे जाताना दिसली.
त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने व मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे गाडीची खात्री पटल्याने सदर वाहनास अडथळा आणून पकडले. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण २५ किलोग्रॅम गांजा मिळून आला आहे.
गाडीतील दोन जणांपैकी गाडी चालक व मालक संजय मोहिते (रा. गोवित्री ता.मावळ) हा पळून गेला .असून दुसरा व्यक्ती सुनिल केदारी (रा.कोळवाडी ता. मावळ जि. पुणे) याला मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याल कामशेत पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा नोंद करण्यात आला, असून ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालसह गांजा व अंदाजे दहा लाख रूपये किमतीची जुनी वापरती ब्रिझा गाडी असा एकूण १३ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी हा सराईत असून त्याच्यावर यापुर्वी दोन गुन्हे दाखल असल्याचे घनवट व जगताप यांनी सांगितले. सदर प्रकरण कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगताप हे तपास करून असून फरार मोहिते याचा शोध सुरू आहे.

error: Content is protected !!