मुंबई:
गणेशोत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या वर्षी सरकारने सार्वजनिक गणपतीच्या आगमन आणी विसर्जन या दिवशी तरी ढोल पथकांना ढोल वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.
गेल्या वर्षी लॅाकडाऊन मुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही.त्या मुळे ढोल-पथकांचा रोजगार बुडाला. त्यांचा मोठा आर्थिक फटका बसला.
या वर्षी मुंबईत करोना आजार आटोक्यात आहे ही जमेची बाजू आहे. आणी ही जमेची बाजू पहाता ढोल-पथकांना या वर्षी सार्वजनिक गणपती आगमन आणी विसर्जन या दिवशी ढोल वाजवण्याची परवांनगी सरकारने द्यावी.
अशी विनंती वजा मागणी “ मुंबई डबेवाला असोशिएशन” सरकारला करत आहे. मुंबईत अनेक डबेवाले आप आपल्या गावच्या ढोल पथकात कार्यरत असतात त्यांना या निर्णया मुळे थोडा फार आर्थीक लाभ मिळू शकतो , असा आशावाद मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!