मुंबई:
सामाजिक कार्यातील सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते क्षितिज ग्रुप, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पांगारे यांना गौरविण्यात आले.
क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच क्षितिज हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशन च्या सर्व मार्गदर्शक, हितचिंतक, सदस्य तसेच सर्व क्षितिज सैनिकांना समर्पित करीत असल्याच्या भावना मंगेश पांगारे यांनी व्यक्त केल्या.
क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून गेले १२ वर्ष महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना एकत्र करून महाराष्ट्राच्या गरजवंताची अविरत सेवा क्षितिजाच्या माध्यमातून सुरु आहे .
अनाथाश्रम वृद्धाश्रम रुग्णसेवा अनाथ मुलांच्या शिक्षणाचा व्यवस्था भुकेल्या माणसाच्या पोटाला अन्न भेटेल याची व्यवस्था महाराष्ट्रतील प्रत्येक कोपऱ्यातील गरजवंता पर्यंत पोहोचत आज हे अविरत सेवा कार्य सुरु आहे. आणि असेच पुढे हि अखंडपणे सुरु राहील असा विश्वास पांगारे यांनी दिला.
क्षितिज ग्रुपची आजपर्यंतची सामाजिक कार्ये पाहूयात.
•भव्य कला क्रीडा महोत्सव
• पर्यावरण संरक्षण – १००% पर्यावरणपूरक गणेश मुर्त्या
• वृक्ष लागवड
•मोर्चा / आंदोलन – अण्णा हजारे
•मोफत संगणक प्रशिक्षण
•धार्मिक कार्य – हरिनाम सप्ताह-भंडारे
•आरोग्य शिबीर
•सामान्यातील असामान्य – जीवनगौरव पुरस्कार
•पुरग्रस्ताना मदत – कोल्हापूर
• गरजू विद्यार्थाना शालेय वस्तू वाटप
• अंगणवाडी डबे वाटप
•वृध्दआश्रम सेवा
• खेळांना प्राधान्य
• स्वछ भारत अभियान
•वाचनालय
•रोजगार मेळावा
• रूग्ण सेवा -औषधे-सरकारी सेवा
• महिला रोजगार
•मार्गदर्शन शिबीर
•सांस्कृतिक कार्यक्रम
•महिला दिन -सन्मान
•मुख्यमंत्री निधी – नैसर्गिक आपत्त्ती- दुष्काळ
•अन्न-धान्य वाटप
• अनाथाश्रम सेवा
२५. आभाळमाया
• अनाथ मुलांना शैक्षणिक मदत
• बचतीसाठी क्षितिज ATM बॉक्स
• गाव भेट दौरे
• छत्री वाटप
•देवदर्शन – जेष्ठ नागरिकांना
• क्षितीज पतसंस्था – आर्थिक पाठबळ आणि आर्थिक सक्षम
•आदिवासी पाडा भेट -गरजुंना मदत
•महिला सक्षम व रक्षण उपक्रम अतंगर्त ठिक-ठिकाणी पथदिवे अनावरण
• महिला व वयोवृध्दांसाठी साथ क्षितिजची २४ x ७ हेल्पलाईन नंबर.
•आपल्या विविध भागातील होतकरू व मेहनती खेळाडूंना प्रोत्साहन .
•विविध भागातील- कंपन्यातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी क्षितिज कामगार युनियनची स्थापना
•. जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी क्षितिज नवशक्ती या वृत्तपत्राची सुरवात या आणि अशा अनेक उपक्रमांवर क्षितिजचा भर आहे.

error: Content is protected !!