करंजगाव:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे स्वीय सहाय्यक सचिन वामन आणि आमदार सुनिल अण्णा शेळके युवा मंचाचे सुजित सातकर, सोमनाथ आंद्रे, हर्षद साबळे, शेखर कटके यांनी करंजगाव येथील समस्यांची पाहणी केली.
करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर, माजी सरपंच भाऊसाहेब मोरमारे,सदस्य महादू शेडगे,सदस्य मधुकर गवारी, बजरंग हिले, शरद सोरकाते, काळूराम भालशिंगे, पांडुरंग मोरमारे, सुरेश हेमाडे, मचींद्र विरनक, अमोल शेलार, रवी पवार,लहू मोरमारे इत्यादि ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन वामन, सुजित सातकर, सोमनाथ आंद्रे, हर्षद साबळे, शेखर कटके,लहू मोरमारे यांनी गावातील विविध समस्या वामन आणि टीम आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
भरपावसात ही मंडळी करंजगावच्या मोरमारेवाडी, ब्राम्हणवाडी, करंजगाव गावठाण, कातकरी वस्तीतील समस्या फिरून पाहत होते. गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी, शाळा इमारत, शाळेचे क्रीडांगण, स्मशानभूमीची स्थिती, आदिवासी पाड्यावर जाणारे रस्ते याची पाहणी या टीमने केली.
भौगोलिक दृष्ट्या करंजगाव विखुरलेले आहे. गावठाण, आणि परिसरातील वाडया वस्त्या अशी गावची भौगोलिक रचना आहे. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या गरजा वाढल्या आहेत. रस्ते,आरोग्य,शिक्षण, सांडपाणी निर्मूलन, पथदिवे, योग्य दाबाने वीजपुरवठा, आवश्यक नुसार विजेची या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य मिळावे याकडे उपसरपंच नवनाथ ठाकर यांनी आमदार शेळके यांचे स्वीय सहाय्यक सचिन वामन यांचे लक्ष वेधले.

error: Content is protected !!