मुंबईचा डबेवाला झाला उद्योजक
मुळशी:
बबन वाळंज दहीसरचा एक सर्व सामान्य डबेवाला वय वर्ष सत्तर तरी ही आपल्या बावीस सहकार्यांन सह दहिसर ते चर्चगेट पर्यंत डबे पोहचवण्याचा व्यवसाय करत होता. या बावीस सहकर्यांन मध्ये सात सहकारी हे तर बबन वाळंज यांचे घरातील होते.
लॅाक डाऊन झाले डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद झाला. घरातील सात जणांचा रोजगार गेला.
लॅाक डाऊन मुळे रोजगार गेला,त्या मुळे नविन रोजगार शोधला पाहीजे असे बबन वाळंज यांना वाटू लागले. मग ते आपल्या गावा कडे वळले त्यांचे गाव पिंपरी ता.मुळशी जि. पुणे येथे आहे.
पिंपरी गाव निसर्ग संपन्न आहे, डोंगरदऱ्यांनी व्यापले आहे आजु बाजुस खुप मोठे जंगल आहे. सह्याद्री डोंगरांच्या प्रचंड मोठ्या रांगा ऐसपैस पसरल्या आहेत आहेत. सोबत मुळशी धरणांचे अथांग असे बॅक वॅाटर आहे. याच परिसरात ऐतिहासिक गड, किल्ले आहेत. याचाच फायदा बबन वाळंज या डबेवाल्याने घ्यायचा ठरवले.
बबन वाळंज यांनी आपल्या अती लहानशा गावात “चैतन्यतेज” नावाचे छोटेसे हॅाटेल चालू केले घरातील मंडळी त्यांना सहकार्य करत असत. फक्त हॅाटेल व्यवसाय केला तर तो ईतका चालणार नाही त्या सोबत ईतर ही व्यवसाय चालू केला पाहीजे असे म्हणुन त्यांनी “ट्रेकिंग” सोबत जंगल सफर चालू केली.
बबन वाळंज यांचे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला पुणेकरांनी प्रंचड प्रतिसाद दिला. बरेच पुणेकर आपली सुट्टी साजरी करण्यासाठी हॅाटेल “ चैतन्यतेज” मध्ये येतात. येथे त्यांना घरगुती पध्दतीचे स्पेशल “मावळी” पध्दतीचे जेवण मिळते. त्यांना ट्रेंकिंगसाठी ताम्हणी घाटात, कुंडलिका व्ह्याली, देवकुंड,कैलासगड,घनगड,कोराईगड येथे नेले जाते तर जंगल सफर म्हणुन अंधारबनात सफारीसाठी नेले जाते अंधारबन ईतके दाट आहे की तेथे सुर्यकिरण जमिनी पर्यंत पोहचत नाहीत म्हणुन त्या बनाला अंघारबन म्हंटले जाते.
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी व ट्रेंकिंगचा थरार अनभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने पिंपरी येथे येतात तेव्हा त्यांना लागणार्या सर्व सुविधा आणी मार्गदर्शन बबन वाळंज आणी त्यांचे कुटुंब करते आहे. यातुन बबन वाळंज आणी त्यांचे कुटुंबाला रोजगार मिळाला आहे.
बबन वाळंज हे मुंबईत जवळ जवळ पन्नास वर्ष डबे पोहचवण्याचे काम करत होते त्यांचे सोबत त्यांचे घरातील सहा जण ही डबे पोहचवण्याचे काम करत असे. लॅाक डाऊन मुळे रोजगार बुडाला पण बबन वाळंज यांनी हार मानली नाही या वयात ही त्यांनी रोजगारांची नविन संधी शोधली त्यांनी आपल्या गावी पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगार चालू केला व त्यात ते यशस्वी झाले.
बबन वाळंज यांनी हा व्यवसाय निवडला व त्यात ते यशस्वी झाले याचा सार्थ अभिमान “ मुंबई डबेवाला असोशिएशन “ ला आहे. बबन वाळंज या डबेवाल्या कडून अनेक डबेवाल्यांना नविन रोजगाराच्या संधी शोधण्याची पेरणा मिळाली आहे.
बबन वाळंज डबेवाला
हॅाटेल चैतन्यतेज
मो.8082581112
सुभाष तळेकर
अध्यक्ष
मुंबई डबेवाला असोशिएशन
मो.9867221310

error: Content is protected !!