करंजगाव: कोणतीही राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ दिलदार स्वभावाने मने जिंकून राजकारणात यशस्वी होता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ भाऊ ठाकर.
जेमतेम माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेला हा तरूण नोकरीच्या मागे धावला नाही. हाताला मिळेल ते काम करीत राहिला. आणि त्यातून मिळालेल्या अनुभवातून या तरूणाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ज्यात त्याने तो चार जणांच्या हाताला काम दिले.
कोणाच्या हाताला काम मिळवून देणे,आणि दिलेले काम अनेक वर्षे टिकवून ठेवणे हेच या तरूणाचे खरे स्वप्न. राजकारणात हा तरूण अपघाताने आला. आपल्यावर नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्याची सुरू असलेली धावपळ वाचण्यासारखी आहे. उपसरपंच हे मानाचे आणि गावपातळीवर प्रतिष्ठेचे हे पद असले तरी त्यासाठी त्याने अनेक खस्ता खाल्ल्या आहे.
पदरमोड ही केली,वेळ काळ कशाचेही भान ठेवता हा तरूण कार्यकर्ता सेवेला सादर झाला. रात्री अपरात्री कधीही कोणाचीही फोन आला तर हा पठ्ठ्या मदतीला हजर.
प्रसंग सुखाचा असो नाही तर दु:खाचा हा गडी सगळ्यात पुढेच. त्याचा कधीच अखडता नाहीच. नेहमीच प्रत्येकाला मदतीची भावना असलेल्या तरूणाला त्या मुळेच कोणीतही राजकीय पार्श्वभूमी नसताना घवघवीत यश मिळाले. निवडणुकीचा आखाडा संपला की,राजकीय मतभेद विसरून सामूहिक कामासाठी झटत राहायचे. प्रत्येकाला मानसन्मान देऊन आदर करायचा हे साधे गणित उमगलेल्या तरूणाला त्यांच्या पुढच्या कारकिर्दीस अनेक शुभेच्छा.
आज या सह्य मित्राचा वाढदिवस आहे, ठिकाण कोणतेही असो. आणि परिचयाचा कोणीही असो. त्याला चहा साठी आग्रह होणारच. हे नवनाथ भाऊ याचे मोठे वैशिष्ट्य.कितीही महत्वाचे काम असले तरी सोबतच्या माणसाला मध्ये सोडणार नाही. एकतर त्याला वेळ देऊन त्याचे म्हणणे समजून त्याला मार्गी लावून हा तरूण पुढे जाईल.
नाहीतर त्याला सोबत घेऊन आपले काम करीन मनात कितीसा ही द्वेष मत्सर याचा लवलेश नसलेला हा तरूण सार्वजनिक आणि वैयक्तिक कामात पुढेच. त्यामुळे त्यांची राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींशी स्नेहयाचे आणि सलोख्याचे रिलेशन आहेत. आता तर उपसरपंच पदी संधी मिळाली पण जेव्हा राजकारणात येण्याची थोडीही शक्यता नसताना या मित्राने सार्वजनिक कामासाठी मिळावलेली मदत निश्चित कौतुकास्पद आहे.
हा तरूण एकतर कोणाला शब्द देत नाही आणि दिला तर मोडीत नाही. दहा वर्षापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत हा तरूण खंबीरपणे मित्रांच्या आग्रहावरून आपल्या शब्दावर ठाम रहिला. पण यासाठी त्याला मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. काम केले तर वाया जात नाही. पेरले तर उगवते हा निसर्गाचा साधा नियम या मित्राच्या बाबतीत तंतोतंत खरा ठरला. त्याने माणसे जोडली,जोडलेल्या माणसांनी त्याला साथ सोबत आणि बळ दिले.
तुम्ही एक पाऊल पुढे येऊन मदत केली तर नवनाथ ठाकर हा तरूण दहा पावले पुढे येऊन पाठीशी खंबीर पणे उभा राहील एवढा मोठा विश्वास या तरूण सहका-याने मिळवला आहे. ज्याच्या ठायी त्याची निष्ठा त्यासाठी काहीही सोसायची आणि सहन करायची तयारी या उमद्या कार्यकर्त्यांकडे आहे. माणस जोडण्याची त्याची कला निश्चित अनुकरणीय आहे. संसारात सुखी समाधानी असलेल्या या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

error: Content is protected !!