कामशेत:
दगा फटका करणारा,धोका देणारा,फसवणूक करणारा,लबाड्या करणारा पाप करून मृत्यू झाल्यानंतर जाईल कुठे असा भाव अनुंकपा साधकाला हवा तसेच स्वतःला स्वतः बद्दल दया असली पाहिजे.पाप करण्या पासून स्वतःला आणि किमान आप्तस्वकीयांना तरी रोखा असा सल्ला प.पू.सा. दर्शरत्नाश्रीजी म.सा. यांनी दिला.
चर्तुमासा निमित्त आराधना भवनातील उपदेश करताना महाराज साहेब बोलत होते. मानवाला सुख मिळविण्यासाठी धावाधाव करूनही सुख मिळत नसल्याने आपण दु:खी आहोत.
स्वार्थी जग आहे,स्वार्थाची लालसा मिटली की सबंध तुटतात. रिलेशन तुटले ही दु:ख वाट्याला येते. अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळ आहे.अपेक्षाभंग झाल्यावर आपणाला दु:ख होते,याकडे लक्ष वेधून प.पू.सा. दर्शरत्नाश्रीजी म.सा म्हणाल्या,”
सुख पराधीन आहे.संसारातील कंटाळा तीन प्रकारे येतो.पहिला दु:ख गर्भित, दुसरा मोह गर्भित तर तिसरा ज्ञानगर्भित. वैराग्य ज्ञानगर्भित असावे. आपल्या भोवती दु:खाचा पाढा आहे. म्हणून आपल्याला संसाराच्या प्रती कंटाळा येतो.
संयम जीवनाची अनुभूती ही आपली अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.मोह मायात आपण अडकलो आहोत. ज्ञानगर्भित वैराग्याशिवाय सुखाची व्याख्या नाही मिळणार. सर्वसामान्य माणसाचे वैराग्य टेन्शन मुळे आम्हाला येणारे वैराग्य क्षणिक आहे .
ज्ञानगर्भित वैराग्यासाठी मिळविण्यासाठी परमात्म्याने दिलेल्या संदेशाचे अनुकरण केले पाहिजे. राग आणि द्वेषाचा तिरस्कार करा. असे वाटले तरच संसाराची विरक्ती जाणवलेच. आपल्यात दोष आहे ,आपल्यात काही कमी आहे याची आपणाला जाणिवच नाही. आपल्या चुकीवर बोट ठेवले तर आपल्याला राग येतो. इतरांचा तिरस्कार करण्यात आपण पटाईत असतोच. पण आपण मात्र सर्वगुणसंपन्न असलेल्या भावात वावरतो हा विरोधाभास नाही का?याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या पुढे म्हणाल्या,”
दुसऱ्याच्या मदतीला धावून आल्यावर दया जागृत होती. अन्नदान केल्याने वस्त्र दान केले तरी त्याला मर्यादा आहेत. मानवाला सुखीच करायचे असेल,तर त्याला
पाप करण्यापासून रोखा,त्याला मदत करायची तर पाप आणि लोभा पासून रोखा. द्वेष,मत्सर,राग याला थारा देऊ नका.
योग्यता प्रमाणे ज्याला त्याला सगळे मिळते.पापापासून त्याला रोखा. कोणाची निंदानालस्ती ऐकण्यासाठी कान नाही,कान देवाचे नामस्मरण ऐकण्यासाठी आहे. जीभेला ताब्यात ठेवा.मन व तनाने केलेले पाप आत्म्याला भोगावे लागते. भले मोठे पाप करून आम्ही कुठे जाणार याचा साधा विचारही आमच्या मनात येत नाही. परमेश्वराने देह दिला,हे अवयव दिले ते चांगले कर्म करण्यासाठी आहेत.
देवाने दिलेल्या अवयवाचा युज करा मिस्युज करू नका या अवयवाचा दुरूपयोग केला तर त्याची प्रणिती पुढील जन्मी भोगावी लागेल.

error: Content is protected !!