राष्ट्रवादी युवकच्या सरचिटणीस पदी तुषार दळवी
पवनानगर :
कोथुर्णे येथील तुषार दळवी यांची मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कैलास गायकवाड, मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे शिवणेचे सरपंच अजित चौधरी, शिवती- येळसेचे उपसरपंच अक्षय कालेकर ,युवा नेते निलेश दळवी, दिलीप दळवी, विजय दळवी, भाऊ दळवी उपस्थित होते.
तुषार दळवी यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे खजिनदार, सरचिटणीस या विविध पदावर काम केले आहे तसेच पवन मावळात त्यांचा तरूणांमध्ये दांडगा संपर्क आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षानी ही जबाबदारी दिली आहे
दळवी म्हणाले”, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करून पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.

error: Content is protected !!