सोमाटणे:
डोणे येथे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या वतीने एकता प्रतिष्ठाण डोणे व समीर खिलारी व मिञपरिवार यांच्या सहकार्यातुन व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वृक्षारोपण करून ” चला ऑक्सिजन वाढवूया ” असा संदेश देण्यात आला
डोणे ग्रामपंचायत व लायन्स क्लब यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणा बद्दल आपले कर्तव्य समजून तळ्या जवळील मोकळ्या परिसरात तसेच स्माशानभूमी जवळील मोकळ्या जागेत प्रायोगिक तत्त्वावर चिंच गुलमोहर कडूलिंब वड पिंपळाची अशा ३० झाडे लावण्यात आली.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष दिपक बाळसराफ ,ॲड् नंदकुमार काळोखे,डाॅ.शाळीग्राम भंडारी,प्रकाश पटेल, यशवंत पाटील, महेश शहा,डॉ. अनिकेत काळोखे, मनोहर दाभाडे, गौरव शहा, मयूर राजगुरव,अॅड् सोमनाथ पवळे, डॉ.सचिन पवार , राजेंद्र नांदेडकर,व एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या वतीने ” माझे गाव सुंदर गाव ” संकल्पनेतून डोणे गावात लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या वतीने गावामध्ये समाज उपयोगी प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत अशी माहिती लायन्स क्लबच्या वतीने देण्यात आली
यावेळी पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर , डोणे गावचे पोलीस पाटील उमेश घारे,सरपंच सारीका कुंभार एकता प्रतिष्ठाचे संस्थापक- बाळासाहेब घारे,पै.संकेतदादा आसवले युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक-अध्यक्ष समीर खिलारी, एकता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कारके, बाळासाहेब घारे(सिनिअर) सोमनाथ खिलारी,रंजित खिलारी, विजय कारके, संतोष कारके,शिवलिंग कुंभार, बाबूराव खुराशे,आकाश कारके,गौरव कारके,पोपट कारके इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.समस्त डोणे ग्रामस्थांच्या वतीने लायन्स क्लबचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!